पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैद्यकी व शस्त्रक्रिया Medicine and Surgery. १३३ राज्यास श्रेयस्कर आहे म्हणून. त्याजवरून मनास आणिता तुझी थोर, वैद्यक्रियेत निपूण, गोर गरिबांस औषध द्याल तेणेकरून राजश्री स्वामीस व स्वामींच्या राज्यास श्रेयस्कर, हे जाणून तुझांवर कृपाळु होऊन तुह्मांस धर्मार्थ आरोग्यशाळेबद्दल पेशजी मळोजी पवार यांनी मोकासबाबचा अम्मल मौजे मजकूरचा दिला होता, तो हल्ली मोकळा करून पूर्ववत प्रमाणे तुम्हांकडे करार करून दिला असे, व सरकारतर्फेनें मौजे मजकूरचा अम्मल जाहागीर व फौजदारी व सरदेशमुखी व बाबती, घास दाणा व खरेदीसुद्धा वगैरे कुलबाब कुलकानु आरोग्यशाळेबद्दल दखील वेठबिगार करार करून दिला असे. तरी मौजे मजकूरचा अम्मल कुलबाब कुलकानु राबस्त देखील वेठबिगारसुद्धा आपले दुमाला करून घेऊन मौजे मजकूरचा जो आकार हाइल त्याचा व्यय आरोग्यशाळेकडे करून सुखरुप राहणे. गांवचा तनखा रुपये ३०७॥ तीनशे साडसात रुपये आहे, परंतु गांव गुज्यावीस सबब इस्तावा परगणे मजकुरास दिला आहे. त्या हिशेबी प्रमाणे चौथे वर्षी आठ नवशे रुपये आकार होईल. पैकी वाजवी तह करून दिल्याममाण पवाराचे मोकासबाबेचा ऐवज वजा होऊन बाकी सरकार तर्फेचा ऐवज आकार सालहासाल होत जाईल. त्याचा धर्मार्थ औषधाचा बारमाही खर्च करीत जाणे. गरीबगुरीबांस औषध दल, सरकारांत जप्त करून दुसरीयास गांव सांगावा असा करार करून दिला असे, ह्मणून मशार निल्हेचे नावें सनद ... . मौजे मजकूरास सनदा १. रसानगी चिट्टी. देशाधिकारी लेखक वर्तमान भावी यास पत्र १. जमीदार परगणे नाशिक यास पत्र इ० स० १७५५-५६ सित खमसेन [२१४ ] मोरोजी शिंदे, जंजिरे रेवदंडा, यांस सनद की, फिरमाडतीग पाद्री वैद्य फिरंगी रेवदंडेकर यास नक्त रुपये २५ पंचवीस भात कैली खंडी (१) एक खंडी भात करार करून देविले असे. तरी सदरह पाव अलफ प्रमाणे पावता करणे आणि मशानिल्हेचे नावें खर्च लिहित जाणे ह्मणोन सनद १. सफर १८ 214 A Sanad to Moroji Sinde of fort Revdanda:--Fir Mad-Tig Padri (फीर माडतीग पादी वैद्य), a Portugese doctor, has been granted (annually ) 4. D. 1755.56 Rs 25' in cash and rice one Khandi. The amount and the quantity of rice should be paid accedingly,