पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [२०९] राजे महंमद, शस्त्र हकीम, यांस मौजे .... .... हा गांव पेशजीच्या मोकासीयाकडून दूर करून हल्ली मोकासा दिल्हा इ० स० १७५०-५१ इहि खमलेन असे. तरी मशार निल्हेशी रुजू राहून मोकास बाबेचा अंमल सुरळीत मया व अलफ देणे ह्मणोन. गांवास सनद १. जिल्हेज ६ श्रीपतराव बापुजी यास सनद १. की गांवचा आकार होईल तो बद्दलमुशाहिरा खर्च लिहिणे ह्मणोन. [२१० ] नरोराम बिन नरहर वैद्य उपनाम देव, गोत्र अवतिक्ष्ण, सूत्र कात्यायन, वास्तव्य कसबे नवापूर, प्रांत बागलाण; तुझी हुजूर येऊन विनती केली इ. स. १७५२-५३ सल्लास खमसेन की, आपण पुरातन वैद्य, परोपकारार्थही औषधउपाय करितो. कुटुंब मया व अलफ वत्सल, योगक्षेम चालिला पाहिजे. यास्तव राजश्री दमाजी गायकवाड जिलकाद ४ यांनी माहालोमाहाल सरकारचे आकाराखेरीज गुजराथ प्रांतें रयत निसबत धर्मपट्टी करून दिली आहे. महाल बी तपशील:-रुपये:-- १२० परगणे उरपाड. ५५ परगणे अंकलेश्वर. ५५ परगणे हसोठ. ४५ परगणे पारचोल. ५० परगणे सुपें. ३२५ एकूण सवा तीनशे रुपये पांच महाटी करून दिले आहेत, त्याप्रमाणे आजी तागायत पावत आले. हल्ली सदरहू महाल सरकारांत जहाले, यास्तव सदरहू प्रमाणे धर्मपट्टीचा ऐवज करार करून दिला पाहिजे ह्मणून. त्यावरून मनास आणितां तुह्मी प्रामाणिक वैद्य, परोपकारी जाणून तुह्मास सदरहू महालावरी पेशजी प्रमाणे सवा तीनशे रुपये सरकारचे जमाबंदी खेरीज रयत निसबत धर्मपट्टी करार करून दिले असेत. तरी सदरहू प्रमाणे सवा तीनशे रुपये सदरहू पांचा माहाली कमाविसदाराकडून वसूल करवून घेऊन वैद्यक करून सुखरूप रहाणे, दरसाल सवा तीनशे रुपये घेत जाणे, आल्या गेल्यास औषध उपाय करीत जाणे, ह्मणोन-पत्र १ A. D. 1750-51 209 A village was granted to Raje Mahomed, a mall skilled in surgery. 210 Naroram Narhar Deo, residing in Kasba Newapur in Prant Baglan, used to dispense medicines gratis to the people. A. D. 1752-53, allowance was, therefore, conferred on him.