पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इनाम, नक्त नेमणुका, वतने वगैरे. 9 Grants and Continuconce of Inam &c.१११ दिला. त्यास वसई फत्ते झाली ते समयी श्रीमंत ठाणीयास आले तेव्हां आमचे दोघे तिघेजण ब्राह्मण येऊन श्रीमंतांचे चरणाजवळ अर्ज केला की आह्मी गरीब, आमची वतनें सरकारी अमा नते दिली आहेत ती स्वामीनी कृपाळू होऊन आमची आझांस देवावी. त्यावरून श्रीमंतांनी आज्ञा केली की सांप्रत पुणीयास जाण्याची उतावळी आहे; पुढें खासा स्वारी या प्रांति होईल. तेव्हां मनास आणूम तुमची वतने तुझांस दिली जातील ह्मणोन आज्ञा केली होती. त्यास श्रीमंत आपासाहेब कैलासवासी झाले. यामुळे आमची वतने तशीच राहिली; त्यास अलिकडे चार पांच वर्षे आह्मी हुजूर अर्ज करावयाशी येतो. स्वामीनी कृपाळू होऊन आमची वतने आमांस द्यावी मणोन अर्ज केला. व येविशी तुझी प्रांत मजकूरचे पाटील झत्रे आणून गांवगन्ना चौकशी करून जोशी उपाध्ये खरे पुरातन वतनदार होते त्याप्रमाणे कतबे लिहून घेतले आहेत ह्मणून विनंति केलीत. त्याजवरून पळशे व गोवर्धन हे गरीब, यांजवर कृपाळू होऊन परगणें मजकूरचे पाटील मत्रे यानीं कतबे लिहून दिल्हे आहेत त्याप्रमाणे पळशे व गोवर्धन मजकूर यांची वतने यांशी उपभोग करावयाशी आज्ञा केली असे. देहझाडा बीतपशील. २७ तर्फ तु.. ३३ तर्फ मालाड. २४ तर्फ मराळे. ___१ कसबा वानरें. १४ तर्फ ठाणे. ५ तर्फ घोडबंदर. ४ तर्फ धारावी. १०८ पैकी वजा अमानत वारिसदार नाहीत. सबब जोशी उपाध्येपण सरकारी देह समार, १३ तर्फ तुर्भे. र तर्फ मालाड. १४ तर्फ मराळे. ३ तर्फ ठाणे. ३८ बाकी निसबत वतनदार देह सुमार. १४ तर्फ तुर्भे. २५ तर्फ मालाड. १० तर्फ मराळे.