पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांची रोजनिशी. यांस दरमहा तैनात अकरा व इनामगांव निमें दिल्हा असे. किले मजकूरची सबनिशी व इनाम गांव निमे तुझी व तुमचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें अनभवून सुखरूप राहणे ह्मणोन सनद १. येविशी सनदा. १ मौजे मजकूर यांस निमें इनाम विशी १ कर्णाजी शिंद नामजाद व कारकून. किल्ले माहुली यांस सबनिशी विशी. [१८३] दामाजी सजणाजी परभू यानी हुजूर येऊन विनंति केली की मामले मजकुरी म . गागेलीची वाडी एक आपणास इनाम सुदामत फिरंगीयाचे अमलापासून तिस्ता आन आहे. त्यास आपण राजक्रांतीमुळे मुंबईस गेलो. त्याजवरी मामले मजकूर मया व अलफ. सरकारांत घेतलीयावर सर्व इनामदार हुजूर आले. त्यांस चौथाई इनाम करार हज 17 करून दिल्हा. ते समयी आपण आलों नाही. याजकरितां कृपाळू होऊन सर्व इनामदारांप्रमाणे चौथाई इनाम चालविला पाहिजे. ह्मणोन व वाडी इनाम सुदामत आहे ऐसें राजश्री मोराजी शिंदे यांचे पत्र आणून दिल्हें त्यावरून वाडी मजकूराचा चौथाई महसूल यास पाल द्यावयाचा करार केला असे. तरी आकार होईल त्यापैकी चौथाई याशी पाल देणे. वरकड वसूल घेणे ह्मणून बहिरोराम कमाविसदार मामले रेवदंडा याशी सनद १. [१८४] रामाजी महादेव नामजाद प्रांत साष्टी यांस सनद की पळशे ब्राह्मण व गोवर्धन इ. स. १७४८-४९. वतनदार परगणे मजकूर यांनी कसबें पुणीयाचे मुक्कामी हुजूर येऊन तिस्सा आईन विनंति केली की, आपण पुरातन वतनदार उपाध्येपण व जोशीपण आपले मया व अलफ. आहे. श्रीमंत आपा कैलाशी साहेबी साष्टी प्रांत फत्ते केला ते समयी आपण मोहरम ६. भयास्तव परागंदा होऊन मुंबई प्रांती गेलो होतो. श्रीमंतांचे दर्शनास यावे. त्यास आह्मी फिरंगाणचे राहणदार, ह्या राज्याची स्थिती रीत ठावकी नाही, भयाने दर्शनास न आला, वसई व बेलापूर येथील जोशी उपाध्ये हजर होते. त्यांची वतने चालतात. आणि आझी समयीं नव्हतों, याजकरितां आमची वतने सरकारांत अमानत करून कमाविशीस सरकारचा गुमास्ता ( 183.) Damaji Sajnaji Parbhu represented that a hamlet in Mamle Rewadand was held by him in Inam during the Portuguese administration A. D. 1748-49. and that in consequence of the change of Dynasty, he had gone to Bombay, and prayed that, as in the case of Inamdar's who presented themselves on the conquest by Government of the territory in question, one fourth of the hamlet might be continued to him as Inam. His prayer was complied with.. ( 184 ) On the conquest of Prant Bassein by Appasaheb ( Chimnaji Appa, Peshwa's uncle) the watandar Priests and Joshis of the terriA.D. 1748-49. tory, surname Palse and Gowardhan, being afraid of the new rule left their homes and went to Bombay without seeing the Peshwa. Their watans were therefore attached. They subsequently came to Poona, and prayed for the restoration of their watans. Their prayer was granted, and a nazar of Rs. 2001 was levied.