पान:बाळमित्र भाग २.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. णग्यांत राहीन, किंवा दारुगोळ्याचे छकड्यावर बसेन, माझे काय ? शिवा०- बरें, पण तुला जर बापाचे वांटचे घतेलें त- र मग तुलाही जावे लागेल; मग तुझा बाप आ. णि तूं एके ठिकाणी कोठून असणार ? गण- चिंता नाहीं; माझ्या योगाने बाबाचें राहणे मातारपणी माझ्या आईबहिणींजवळ तर होईल, पुरे, येणेकरून मला फार आनंद होईल. माझा बाबा जसा मोठा पराक्रमी आहे, तसा मीही लौ. करच होईन. मला शिपाइगिरी करण्याची फार आवड आहे; ही पहा लढाईची बखर किती चां- गली आहे, व शिपाईलोकांस किती आनंद देते ती! ही मी तुझांस बक्षीस देतो. शिवा०- (तान्हाजीकडे संकेताने पाहतो, कांहीं ए. क कल्पना मनांत आणतो.) मला, तुझी बखर मी घेतली, पण तुला मीही एक चांगली बखर दे- तों, ही घेऊन तूं आपले बापाकडे जा. ( रुमाला- तून एक लाखोटा काढून गणपतरावाचे हाता देतो.) गण- ( आनंदयुक्त होऊन ह्मणतो.) बरे, ही ब- खर मी वाचूं आतां ? शिवा- आतांच वाचूं नको. आमी येथून गेल्यावर मग वाच. ( आपल्या हाताने गणपतराव ह्याचे खि- शांत लाखोटा घालतो.) ही बखर तूं गमावू नको