पान:बाळमित्र भाग २.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ बाळमित्र. आलों हणजे मग मला दे. मग तर कांही चिंता नाहीं ? यमु०- तर मग मी घेते. गणपतराव, चला, आतां जाऊं. गण- मला काही काम आहे ह्यांपाशी; तुह्मी जा, मी आपला मागून येईन. ( इतक्यांत तान्हाजी बाहेर गेला होता तो माघा. रा येऊन शिवाजींचे हातांत कागदाचा रुमाल देतो, आणि तोंडाला पदर लावून कानाशी लागतो.) यमु०- काय तुमचे मनांत आपणाला आणखी एक मुदी मिळावी, ह्मणून घुटमळतां १ हिरा०- (हळूच ह्मणते.) हे काय भाऊराया ९ असे धनलोभ्यासारिखें काय करतोस ९ द्रव्याच्या आ. शेने तुझें मन गुंडाळते, ह्मणून आझांबरोबर याव. याला मागे पुढे करितोस वाटते ९ गण - तुमच्याच मनांत द्रव्याची आशा आहे, ह्मणू- नच असे उद्गार तोंडातून निघतात; हे तर माझ्या गांवी देखील नाही. माझें कांहीं नाजूक काम आहे, ह्मणून मी मागे राहतो. तुह्मी त्याला सत्रा कल्पना काढून बोलणार. यमु०- नाजूक काम ९ काय करूं बाबाचे जाण्यामुळे माझें चित्त स्वस्थ नाही, नाहीतर तुमचे नाजूक काम पहावयाची मला फार हौस होती. गण- जर-जर- जर तूं माझी बहीण नसतीस, तर