पान:बाळमित्र भाग २.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. गाल तर मी आपली लाहोरी बंदूक, व सुरा, व कांसवाची ढाल, व मुलतानी कमान, तुझांला देईन. शिवा०- ह्याची मसलत मला काही सुचत नाहीं, सु- चती तर मी तेव्हांच सांगतों. यमु०- आह्मांला कांहींच का उपाय करता येणार नाहीं ९ आह्मी असें करूं की, पागेचे मुख्य सरदार शिवाजी उद्यां एथें आले, झणजे त्यांचे पायांवर आझी सर्व लोळण घालून पडूं, आणि, तुमचे बा- पास मी लढाईस नेत नाही, असे जेव्हां ते ह्मण- तील तेव्हांच उठू, नाही तर कधी उठणार नाही. हिरा०- हो हो, गडे, असेंच करूं; आणि त्यांस झणूं की, हिवाळ्यांत बाबा फार दुखणाईत होता, अझू- न काही चांगला बरा झाला नाही, त्याला नेऊ नका, त्यावांचून आमांस कसे करमेल ? मग राव- साहेबांस आमचे डोळ्यांची आसवें पाहून दया ये- णार नाही की काय ९ आणि ते आह्मांस पायांनी ढकलून देतील ९ तुह्मांस कसे वाटते बरें ? शिवा०- हे मुलांनो, तो तुझांस कधी ढकलून देणार नाही. पण तो आतांच जर आला नसेल तर पुढे येणार नाही; आणि जर तो न आला, तर मग तुमच्या कल्पना तुमच्याठायी राहतील नव्हे : पण शिवाजीप्रमाणेच एक मोठा मानकरी त्या पा- गेंत शिवाजीचे हाताखाली शिकणाऊ आहे, त्याचा