पान:बाळमित्र भाग २.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. शिवा०- होय, मुली, होईल खरे; परंतु जर तो आ- पली दुसरी मुले तुजप्रमाणे तरबेत करील तर होईल. यमु०- लोक मला फार घट्ट मानितात, आणि ह्मण- तात की, यमनीला ढाल तरवार भाला दिला ह्म- णजे फार चांगला बारगीर दिसेल. शिवा०- हो हो, मग तर तं फार चांगली शिपाइाग. री करशील. यम- मजजवळ ढाल तरवार असती तर मी को. णास हसूं नदेतें. शिवा०- फार बरें, तर, ही घे माझी ढाल तरवार, आणि शिपाई हो, पाहूं. यमु०- (शिवाजी ढाल तरवार पुढे करतो. यमुना ती नघेतां पळून दूर जाते.) अरे, नको बाबा मला. शिवा- अहो शिपाई बाबा, तुह्मी ढाल तरवारीला भिऊन पळतां? यम- मी भ्यावयाची नाही, पण तुझी माझे जवळ येऊनका, जवळ आलां तर मी बाबाला हाक मा. रीन. माझी आरोळी ऐकतांच बाबा मजकरितां धां- वून येईल. शिवा- मी कांहीं तुजवर बलात्कार करीत नाही, उगीच थट्टेने तुजपुढे ढाल तरवार केली.