पान:बाळमित्र भाग २.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ बाळमित्र. चे झणणे की, मी आपल्या धन्याकरितां लढाईत मेलों तर फार चांगले; पण ईश्वराने मला घोड्या- वर बसावया पुरती शक्ति मात्र द्यावी मणजे झाले, तर एखादे दिवशी त्याचे बोलण्याप्रमाणे जर झाले, तर मग आमी पोरांबाळांनी कोणाचे तोंडाकडे पाहावे ? शिवा०- आठव नाही, मुली, तुला १ त्याजवर आज पावेतों किती प्राणसंकटे आली, पण त्या तित- क्यांतूनहीं देवाने त्यास वांचविले; आणि आतांच का इतक्या कल्पना तुझ्या मनांत येतात ९ लढा- ईत सर्वीसच गोळ्या लागतात असे काही नाही. हिरा०- पण ज्यांना लागतात ते तेव्हांच ठार होतात. त्यांतली एखादी लागली तरी पुरे, मग कसे होईल : शिवा०- तूं ह्मणतेस तेही खरेच आहे; बरे पण ती आणखी एक मुलगी इकडे येते आहे ती कोणाची १ हिरा- ती माझी सख्खी बहीण, तिचे नांव विचाराल तर यमुना. प्रवेश ३, तान्हाजी, शिवाजी, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. हिरा०- अगे यमुने! आतां आलीसना ९ एवढा वेळप- यंत कोठेंगे होतीस १ कोणी तुला खोळंबविले होते?