पान:बाळमित्र भाग २.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. शिवा - आहेत, मुली. हिरा- तर तुह्मी आईबापांस सोडून आला तेव्हां ते तुह्मांकरितां भारी रडले असतील. त्यांनी तुझांस कसे येऊ दिले ९ माझा वडील भाऊ विद्या शिका- वयास जेव्हां दुसरे गावी जाऊ लागला, तेव्हां आह्मी उभयतां पुष्कळ रडलो. तिकडली आशा तरी होती, एथें तर हातावर शिर घेऊन जावें लागते. त्याला ह्याला फार अंतर. शिवा- मुली, तूं ह्मणतेस इतकें कांहीं नाहीं; मी आईबापांस सोइन फारवेळ लढाईस गेलो आहे. ह्यामुळे तें काम आमचे आरोक्यांत पडले आहे. मी पहिल्याने तर बापाबरोबर लढाईस गेलो होतो. हिरा- जे शिपाईलोक आहेत त्यांस फारशी दया माया नसती, हे मला पुरतें माहीत आहे; पण मा- झा बाप कांही तसा नाहीं हो; त्याला दया माया पुष्कळ आहे. त्याचे मनांत तर आपली प्रतिष्ठा राहून सर्वस्व नाश जरी झाला तरी त्याची काळ. जी नाहीं; ह्मणूनच रजा घेण्याविषयी त्याकडून आळस तो. शिवा०- कां, असें कां? हिरा- तो वारंवार बोलत असतो की, मदीचा लेक लढाईचे वेळेस जर रजा मागेल तर त्याला लोक भितरा असे ह्मणतील. ह्यासाठी त्याने कधीही अशा प्रसंगी रजा मागितली नाही. आणखी त्या-