पान:बाळमित्र भाग २.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ बाळमित्र. हिरा०- आह्मां गरिबाला एवढा मोठा गांव जहागिरी- चा कोठचा १ एवढा असता तर मग काय पाहिजे होते; बाबाची एवढी आंबराई मात्र, आणखी मि- राशी जमीन, बागाईत जिराईत मिळून, चार चाहूर आहे; आमचा बाबा पागे बरोबर नसला ह्मणजे नेहमी एथेच राहतो. शिवा०- बरें बरें, हिवाळ्यांत तो का दुखणेकरी प. डला होता हिरा०- काय सांगावें रावसाहेब! त्याच्याने हातपाय देखील हालवत नव्हते आणि फार दिवस झाले व्याचे कपाळावर एक जखम लागली होती, ती पुन: फुटली, ती देवाने काहीशी बरी केली तों मा- तक्यान त्याला लढाईस जाणे आले. शिवा - रोग्यास कोणी लढाईस नेत नाही, असे आहे तर त्याने रजा मागावी की नाही हिरा०- बाबास नसमजू देतां माझे आईनें रजेविषयी विनंतीपत्र राजास पाठविले आहे, पण त्याचे उत्तर अझून आलें नाहीं; मग काय राजास खरे वाटले नाही, किंवा शिवाजी सरपागे ह्यांनीच मधे पत्र दा- बून ठेविलें, कसे काय असेल ते असो.. शिवा०- चांगले सरदारास कामाचेसमयी रजा दे. ण्याचा संतोष शिवाजीचे मनांत नसेल, असे काही कारण असले तर कोणास कळे. हिरा०- रावसाहेब, तुझांस आईबाप आहेत ?