पान:बाळमित्र भाग २.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. आह्मांस हे पाड विकत देशील ? | हिरा०- नाही, नाहीं, रावजी, तुमी कितीही रुपये दिले तरी मी विकत देणार नाही. शिवा०- खरेंच, हे तुझ्या टोपलीत आहेत ह्मणून ह्यां- चे मोलच नाही, खरे. हिरा०- असे नव्हे, महाराज ! हे मी आपले बापा- साठी जमा केले आहेत; मी आपल्यासाठी केले असते तर तुह्मांस फुकटच देते. (हिराबाई डोळे पुशीत पुशीत बोलते.) यंदा बाबाने अझून पाड खाल्ले नाहीत; आतां तर काय शेवटलेच खाणे आहे. शिवा ० -- काय ९ त्याचे जिवासांड दुखणे आहे ह्मणू. न तूं असें बोलतेस की काय, मुली ? तान्हा.- त्याचे दुखणे पाडावरचे वासनेचेच असेल असे वाटते. हिरा०- ते कांहीं दुखण्यास पडले नाहीत; मागें हिं. वाळ्यात बरीक त्यांस संधिवायु झाला होता, त्या- ची कसर अझून तशीच राहिली आहे. दुखणाईत असोत किंवा नसोत, पण उद्यां त्यांना येथून जाणे अवश्य आले आहे. शिवा- जाण्याची इतकी जरूरी त्यांस काय ह्मणून पडली? हिरा०- त्यांची पागा उद्यां इकडून जाणार आहे ति- जबरोबर त्यांस जाणे प्राप्त आहे. .