पान:बाळमित्र भाग २.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. प्रवेश २, हिराबाई, शिवाजी, आणि तान्हाजी. शिवा०- अहो तान्हाजी, जगदीशरावाचें तें घर म. णून मला लोकांनी सांगितले आहे, चला तिकडे, मी त्याचे प्रतिष्ठेस योग्य अशी रजेची आज्ञा आण- ली आहे, ही ऐकून तो आनंदमय होईल. परंतु ही अतिमुलक्षणी मलगी कोणाची आहे बरें ? थां- बा, मी तिजसंगती काही बोलतों; पण तुही मा- झे मोठेपणाचें नांव घेऊ नका, हो तान्हाजी. (हि राबाईचे खांद्यावर हात ठेवून ह्मणतो,) मुली, तू फार चपळाईनें काम करितेस. हिरा०- कांहो रावजी, तमी मला भिवविले ? शिवा- मुली, रागें भरूं नको, क्षमाकर; माझ्या म. नांत तुला डचकवावे असे नव्हते, तुझा चांगुलप. णा पाहून मला आनंद झाला. बरें, हे चांगले चां- गले पाड कोणासाठी जमा करितेस हिरा- ( पाडांची टोपली त्याजवळ आणिते ) मज गरिबावर कृपाकरुन तुह्मी शांतन कांहीं पाड घ्या. येथे तबक नाहीं, काय करावे, असते तर फार चांगले होते. आंबे त्यांत घालून म्यां दिले असते. | (शिवाजी तान्हाजी त्यांतून एक एक पाड घेतात.) शिवा- वाहवा! असा गोड आणि बिनरेष पाड आ- जपावेतों कधी खाण्यांत आला नव्हता. मुली,