पान:बाळमित्र भाग २.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. मी आपल्याच हाताने आपली प्रतिष्ठा क्षीण करीन. लवकर पारिपत्य होण्याबद्दल जसा पावड्याचा व खिडकीचा नाश झाला, तसा माझ्या सुखाचा व द्रव्याचा नाश होईल. आतां तूं नाशाचे स्मरण ध- रून बागाचा झोपा कोंबडीचे आंत जाणे न हो- ण्याकरितां जसा लावशील,तसा मी आपला मुस्व. भाव त्याच्या कुस्वभावाच्या लहरी मजवर न या- व्या ह्मणून मध्ये आड करीन. मग जशी कोंबडी झोप्याजवळ जाऊन चोंचा मारमारून आपणाला मात्र दुखापत करून घेईल, त्याप्रमाणे हा शत्रु माझे गंभीरपणाजवळ निंदा करता करतां कंटाळून प. श्यात्ताप पावेल. जर मी रागावलों तर लोकांचे दिसण्यांत मी केवळ ओत्सा असें येईल; ह्मणून त्याने केलेली निंदा मी तुच्छ मानितों तेणेकरून माझी प्रतिष्ठा तशीच राहून त्याचीच अप्रतिष्ठा होत राम०- आहा! तात्या, तुमचे सांगण्याप्रमाणे जर मी वागेन तर मीही दुःखांतून असाच पार पडेन. इतकें भाषण झाल्यानंतर उभयतां पितापुत्र घ री गेले. बापाने जो उपदेश केला तो रामचंद्राचे म नांत पक्का ठसला. पुत्रास हितोपदेश केल्याने पु तदनुरूप चालला असतां बापास जे सुख होते, ते गो विदरावाने अनुभविले.