पान:बाळमित्र भाग २.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोबडी. राम०- नाहीं तात्या, आणि कसें ह्मणून विचारण्या. चेही अझून मला धैर्य नाही. गोविंद- त्याला माझा द्वेष करण्याचे कारण मिळून इतकेंच की, चिटनविशीची असामी आमचे तीर्थ- रूपां कडे पस्तीस वर्षे होती, त्या लिहिण्यांत मला तीर्थरूसांनी फार हुशार केले, म णून ती जागा म. ला मिळाली. त्याकाळी भिवराव हा संभावित गृहस्थाचा मूल एवढा मोठेपणा मात्र त्याचे अंगी : होता, वरकड दुसरा एकही गुण सांगावयाजोगा नव्हता. त्याचे जितके वशीले होते तितक्यांनीही त्याविषयीं यत्न बहुत केला, परंतु सरकाराने पुरती चौकशी करून मलाच काम सांगितले, ह्यामुळे आ. मांवर त्याची एवढी कृपा आहे. राम- तात्या, मी तुमचे एवढा जर असतो तर मग त्यास दाखवितों. गोविंद०- असें नाहीं, मुला, त्याचेच मर्जीप्रमाणे त्यास चहाडी सांगण्याची वगैरे सदरपरवानगी दि. ली आहे.. कोंबडीने तुझा नाश केला त्यावेळेस तुला जसे वागावयास योग्य होते त्याप्रकारे मी वागतों; तुझी दवण्याची झाडे किड्यांकरितां जशी कोंबडीने उपटली, तसे माझी प्रतिष्ठा हाच दवणा त्याला तो मनांतील स्पर्धेस्तव उपटतो, आतां जर मी त्याचा सूड घेण्याकरितां झटेन, तर जसें त्वां आ- पल्याच पायांनी आपले पाचेचे रोप तुडविलें, तशी