पान:बाळमित्र भाग २.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोबडी. ईने त्वां आपले सर्व बळ योजिलें, तुला लाज कशीरे वाटली नाहीं १ तिच्या अंगी विचार आहे की काय ? तुझ्या नुकसानीसाठी तिनें फुलझाडे उपटली असें नाहीं, आपल्या आहाराकरितां मात्र. ती आपला आहार शोधीत असतां जर तिनें गव. ताची मुळे उकरली असती तर तुला इतका राग येता? तिचे गांवीं गवत आणि फुलझाडे दोन्ही सारखीच. तूं युक्तीने काम करतास तर इतका नाश का होता. पा- हतां अंती दोष तुजकडेसच. जर तिला हळूच बाहेर हांकून लावले असते तर माझ्या खिडकीचा व पावड्या- चा नाश झाला नसता; दोन तीन झाडांचीच काय ख- राबी झाली असती ती असती. आतां तिचे वांटची तुलाच शिक्षा करावी हे योग्य. जर आतां ह्या झाडाची एक चांगली छडी काढन, जसें तूं कोंबडीचे पारिपत्य करीत होतास तसे मी तुझें केलें तर कसें १ परंतु सर्वांस राग आटोपायाचे सामर्थ्य आ. हे, ह्याचे खरेपणाची खात्री तुला करून दाखवितों. जरी मला राग आला आहे तरी मी आतां तुला मारीत ना- ही, परंतु तुझ्या रागामुळे जो माझे खिडकीचा नाश झाला तो मी सोसणार नाही. तर इतकेंच करीन की, तुझ्या खाऊच्या पैशांतून खिडकी नीट करावयापुर्ने काढून घेईन. असें बापाचे बोलणे ऐकतांच रामचंद्र खजील हो-