पान:बाळमित्र भाग २.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. कोंबडी आपला शत्रु' आला असें पाहून घाबरी झाली, आणि पुन्हां भिंतीवर उडावयास यत्न करूं लागली, तथापि तिची उडी भिंतीचे माथ्यावर गेली नाही, परंतु उडते समयीं पंखाच्या फडाक्याने जवळ- चा दवणा मात्र मोडला. असा नाश झाला तो पाहतांच त्याने हातांत पा- वडे घेऊन रागें रागें मोठ्या जोराने तिच्या अंगावर फेंकलें, परंतु ते तिला नलागतां चक्रासारखें उडून खि- डकीवर पडले, तेणे करून त्या खिडकीची दोन भिग फुटली आणि पावडे दगडावर आपटून मोडले. हे नुक सान होतांच रामचंद्र कुदळ आणावयास धांवला, त तिकडे कोंबडी अगदी दमन एके ठिकाणी कोपन्यास जाऊन बसली. कदाचित तो कदळ आणता तर त्या बापडीची वर्षे भरली असती. परंतु इतक्यामध्ये तो गलबला ऐकून गोविंदराव धांवत आला. रामचंद्र आपल्या बापास पाहतांच गल. बलून उभा राहिला; पण तोंडावाटें अशी अक्षरें नि- घाली की, पहा, तात्या, ही कशी द्वाड जात, हिने मा झे बागांत किती खराबी केली ती ! गोविंदरावाने त्याचे बोलण्याची अनास्था केल्या सारिखें करून उत्तर दिले की, जर त्वां दार उघडे ठेवि -लें असते तर ही खराबी कशाने झाली असती १ त तर कोंबडी, अज्ञानच, तुझा नाश होईल हें ज्ञान तिल आहे की काय ९ असे असतां त्या गरिबावर दांडगा