पान:बाळमित्र भाग २.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोबडी. मोठ्या हर्षाने ती जाऊन चोंचेने व पायांनी माती उ. करूं लागली, व तेथेंच रामचंद्राने दवण्याचे बी टाकले होते त्या ठिकाणी तर तिने फारच उकरून नाश केला. रामचंद्र परतून बागाकडे आला तेव्हां दरवाजा उ. घडा आहे, व बागांत कोंबडी जशी कांहीं माळीण च. मत्कारिक काम करते आहे, हे पाहातांच त्याला अति- | शय क्रोध आला, आणि मोठ्या स्वराने ह्मणतो, हा ! दुष्टे, किती नाश केला रांडेनें, थांब तुझें आतां काम काढितो. असें ह्मणून कोंबडीस जावयास वाट न मि- ळावी ह्मणून बागाचे दार बंद केले, आणि दगड, धोंडे, | ढेकूळ, इत्यादि में हातीं सांपडले ते घेऊन तिचे पाठी- मागे लागून तिला मारूं लागला. कोंबडी भयाभीत होऊन तिच्याने होई तितकें करून इकडे तिकडे पळून, भिंतीवरून उडून जाण्याचा यत्न करूं लागली; परंतु तिची उडी भिंतीवर न जातां पुन्हां रामचंद्राचे फुलझाडांवरच ती पडे. असें होता होतां एके ठिकाणी गुलाबाची पन्हेरी केली होती तीत तिचे पाय व पंख गुंतुन ती अडकली, तेव्हां रामचंद्रास वाटले की, आतां कोंबडी सांपडली, ह्मणून तिला ध- रावयासाठी गेला, तो पाचेच्या वाफ्यांचे वरंबे नवेच बांधले होते त्यांवर पाय कसा द्यावा हे रागाचे भिरा- रीत ध्यानांत न आणितां पाय देऊन ते त्यानेच तुड- वून टाकिले.