पान:बाळमित्र भाग २.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. असे बोलून त्याने त्यास जवळचे बागांत नेलें, आ- णि एक रिकामी जागा पडली होती ती त्यास दाख- वून सांगितले की, आजपासून ही जागा तुझी; ह्या जागेचे तूं दोन भाग कर, एकांत फुलझाडे लाव, व ए. कांत भाजीपाला किंवा जें तुला पाहिजे ते लाव. असे सांगन त्याने त्यास माळ्याचे कोपीत नेलें, आणि मु. ला जोगी जी जी लहान लहान कुदळ, खोरें, खुरपे, इत्यादि हत्यारे होती ती दिली, व लहान लहान पां. ट्या व फुलाझाडांची कलमें, हुंड्या, व बियांच्या पि. शव्या संदुकीत होत्या त्या काढून दिल्या, आणि प्रत्ये. क पिशवीवर विजांची नावें, व कोणते वेळेस कोणते पेरावें मणजे कसे येईल, हे लिहिले होते ते सर्व दा. खवून दिले; तेसमयीं त्यास पराकाष्ठेचा आनंद झाला. जसा राष्ट्राच्या प्राप्तीने राजास आनंद होतो, तसा त्यास त्या जमिनीचे तुकड्याने झाला. तो आनंद त्याच्या वयाची मुले जाणतील. रामचंद्रास पंतोजीने खेळावयाकरिता ह्मणून जा वेळ दिला होता तो त्याने पहिल्याप्रमाणे रिकामा जा. ऊं न देतां आपले बागाचे कामाकडे योजिला. एके दिवशी रामचंद्र विसरभोळेपणाने बागाचा योपा न लावितां घरांत गेला असता. तेथे जवळच एक कोंबडी दाणे शोधीत होती ती रामचंद्राचे बागांत गेली आणि रामचंद्राने नुकतेच फुलझाडांस खत घात होतें तेथें उत्तम प्रकारचे जीवजंतु मिळतील ह्मणून