पान:बाळमित्र भाग २.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोंबडी. ती, तरी त्याची आवड बागाकडे फार असे. तो आठ- वर्षांचा झाला तेव्हां बागांत कांहीं फुलझाडे लावू ला. गला; हा त्याचा छंद पाहून त्याचा बाप त्यास जे आ. वडतें तेंच द्यावें याविषयी विचार करूं लागला. एके दिवशी उभयतां, पितापुत्र भोजन करावयास बसले होते तेवेळेस गोविंदराव ह्मणतो, रामचंद्रा, पंतो- जीने मला सांगितले आहे की, आज तुमच्या रामचं- द्राने मराठी बखर वाचावयास प्रारंभ केला आहे; त्या- सही आजपासून आठा दिवसांत सर्व वाचून त्यांतील ज्या गोष्टी मी विचारीन त्या न्वां तोंडाने सांगिल्या म. णजे मी तुला असें कांहीं उत्कृष्ट बक्षीस देईन, की जें तझ्या ध्यानांत आतां कांहींच येणार नाही. हे बापाचे सांगणे क्षणभर न विसरतां त्या रामचं- द्राने बक्षीस मिळवावयासाठी रात्रंदिवस वाचण्याचा अतिशय श्रम मांडला. तो परीक्षेचे दिवसाची वाट निर्भयपणाने पहात हो- ता; मग उत्तम प्रकाराने बरखर वाचून तीतील सारांश मराठी लोक कस कसे योग्यतेस चढले, हे सांगून, त्यां- नी कोण कोणते मुलूख हस्तगत केले ते सर्व त्याने पृ. थ्वीचे नकाशावरून नचुकतां आपले बापास दाखविले. तेव्हां गोविंदराव हर्षयुक्त होऊन त्याला पोटाशी धरू. न बोलिला की, त्वां मला आज आनंदमय केले, तर चल माझे बरोबर, आतां. मी तुला आनंदमय करितों पहा!