पान:बाळमित्र भाग २.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. प्रवेश ५ गोपाळा, लक्ष्मण आणि विनायक. गोपा.- (लक्ष्मणाकडे हात करून ह्मणतो.) यावें लक्ष्मणराव, यावें. लक्ष्म- मी तुमचे पायां पडतों, आतां मला उगीच छळू नका; मी दुष्ट खरा, आणि प्रारब्धाने ही मज- वर घोरपड आणली; ह्यामुळे मी अगदी मरून चूर झालो आहे. विना०- अंगठी हरवल्याची दंवडी पिटविली का ? लक्ष्म- दंवडी कशाची, आतां हे काळे तोंड घेऊन बापाकडे काय जाऊं. हा जीव किडा मुंगी नव्हे, तर रगडून टाकू आता काय करूं? गोपा.- पैज मारतों की, अंगठी हरणीचे पायीं अ- डकली, आतां त्या दोघींचा थांग एकदाच लागेल. लक्ष्म- बरे बाबा, तुमची था सोसावी हा तर माझा खुराकच, पण दैवाने मागे घेतलें, काय करूं? विना- तूं घाबरा होऊ नको, तुझी अंगठी येथेच आहे. लक्ष्म- खरच काय. माझी अंगठी तमचे पाशी आ. हे अहाहा फार बरे झाले.. गोपा.- ( गंगास एकीकडे नेऊन ह्मणतो.) पहा क. सा विनायक त्याची थट्टा करून त्यास चाळवितो