पान:बाळमित्र भाग २.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. दया आली नाही? विना- अरे, आपणांशी कोणी कपटबुद्धीने वर्तला - ह्मणून आपणही न्याशी तसें वर्तावे, हे चांगले नाही. गोपा.- मी जशास तसा, काय सांगू ९ माझे हाती जर आंगठी लागली असती तर आपला दावा त्या- चेच बापाचे हातून उगवून घेतला असता, की भेद कळू दिला नसता. गंगा- काय तूं तिला चोरून ठेवतास १ गोपा.- नाहीं नाहीं, बापाने त्यास खूप चांगली शि. क्षा केल्यावर मग त्याचे हवाली करतो. विना०- गोपाळा, बराच आहेस किरे ! तूं असा आं. तल्या गांठीचा आहेस हे मला आझून ठाऊक न. व्हते. गंगा- मलाही ठाऊक नव्हते, आणि जरी तूं असें बो. लतोस तरी मला खरे वाटत नाही. जर खरे आ- हे तर तुझ्याच तोंडाने न्याय झाला, आमचे यम- नीचे वेळेस त्वां उगीच तोंड उतरल्याचे सोंग घेत. लेंसे दिसते. गोपा.- अंतःकरणांत खोंचल्यावांचून सोंगाने कुठे असे होते काय १ अहो जे मजशी भले त्यांजवर मी फार प्रीति करतों, आणि मजशी जे वांकडे त्यां- शी तर मी फारच वांकडा. हा इकडे लक्षुमण आ. ला पहा.