पान:बाळमित्र भाग २.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. याची मौज तुह्मांपाशी सांगतो ती ऐका. गंगा- ह्यांत काय तुला चांगले वाटतें १ गोपा.- वाः, काय मौज सांगावी ! तो आंगठी आंग. ठी करीत वैतागल्या सारखा इकडून तिकडे तिकडून इकडे धांवतो आहे, आणि ज्यास त्यास विचारीत फिरतो आहे. भले झाले झणून मी मौज पाहाव- यास त्याचे मागे गेलो होतों! तो मला विचारूं लागला की, माझी आंगठी तुला सांपडली. तेव्हां मीही पहिला डाव मनांत धरून उत्तर दिले की पहा आपली कोठे असेल तेथें, मला काय विचार- तोस ९ त्वां आपल्या जामदारखान्याचे काम मजक. डे सांगितले आहे काय ? मग तो वरमून बोलला की, तुला जर तिची किंमत ठाऊक असती तर अ. से कधी बोलतासना; मग मी झटले, खरेच, ज्यास सांपडली असेल त्याची धनच झाली असेल; तो केवढा दैववान् ! त्याचा आनंद गगनांत मावत न. सेल. मग तो बोलला, बरें, बाबा, काय ह्मणशील तें ह्मण, पण मला तर असा समय प्राप्त झाला, आतां माझा बाप मला काय ह्मणेल ९ तेव्हां मी उत्तर केले की, बाप काही झणणार नाही, पण कोलदांडा आणि मिरच्यांचा धूर मात्र सिद्ध करील. गंगा- अरे अरे, दु:खावर असा डाग द्यावयाचा न. व्हता. गोपा०- कां नव्हता . त्याला बरी न्यावेळेस तुमची