पान:बाळमित्र भाग २.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. गंगा- रावजी, तुमचर्चाच चाल आमांस लागेल, दुसरी लागावयाची नाही. जसे तुझी आहां तशीच आह्मी होऊं. विना०- मी आतां ही सवास दाखवितों, नाही तर, रावी, शहरांत एकदाच दंवडी पिटवावी की, हर- _णी हरपली, व आंगठी सांपडली. राम.- थांब, उगीच ऐस, यक्तीनेच ज्याची त्यास पो. होंचती होई असें केले पाहिजे, नाही तर एखादा ठक येईल आणि माझीच ह्मणून उपटून घेऊन जाईल. विना- मीही जशास तसा होऊन आंगठीच्या सर्व खुणा खाणा विचारून घेऊन मग देणे तर देईन; नाहीतर कद्धी कोणास देणार नाही. राम- ही तुझी युक्ति काही उपयोगाची नाही, का- रण की, जर कोणी हिला मालकाचे हातांत पाहिले असले, तर तो सर्व खुणा खाणा देखील सांगेल, आणि घेऊन जाईल. मग मालक आला तर त्या- स काय देशील? गंगा- तूं आपलें शहाणपण मिरवू नको, कसे कराव- याचें तें तुजपेक्षां रावीला अधिक ठाऊक आहे. राम- दमादमाने केले पाहिजे, कांकी एवढ्या किमती- ची आंगठी गमावली आहे त्यापक्षी तिचा धनी उ. गीच बसणार नाही, फारच शोध करील. विना- शोध करण्याची कल्पना त्याला नाही जर