पान:बाळमित्र भाग २.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. रून मी केव्हां आनंदित होईन, अशी चिंता म्या ठेवली असती. विना- ह्यांत तूं काय अधिक सांगतोस ? हिचे ध- न्याने मजजवळ यावें झणजे मीही तेव्हांच देऊन . टाकीन. सांपडलेली वस्त लपविणे आणि चोरी करणे एकच आहे. ज्याचा माल त्यास द्यावा. राम- मग हा तुझा आनंद आणि ह्या उड्या राह- तीलसे वाटते. विना०- ही सांपडली तेव्हां माझें दैव फार चांगले असें मनांत आले होते, पण ताईने सांगितले की ज्याची गमावली त्याला फार दुःख झाले असेल, त्यावरून मी आनंदित नाही, मला वाईट वाटत: ह्यासाठी ज्याची त्यास दिली झणजे मला फार आ- नंद होईल, नाही तर दर खेपेस तिजकडे पाहून माझी नव्हे ह्मणून मला लाज वाटेल. गा- दुसऱ्याचे दुःख दूर करणे ह्यांत फार सुख आ- हे, ह्यासाठी लक्षुमण माझें उतरलेलें तोंड पाहून हरणीला ठेवील असे घडणार नाही. गम०- (आनंदाने उभयतां मुलांचे चंबन घेऊन म- णतो.) ही गुणाची मुले ईश्वराने मजवर कृपाल होऊन दिली, आहा, ह्यांचे योगाने मी किती आ. नंदी आहे ! धन्य मी, की मला असली मुले. मु लांनो, अशी भूतदया सर्वकाळ मनांत असूंद्या बरें ह्मणजे आपणांस व दुसन्यांस फार मुख होईल.