पान:बाळमित्र भाग २.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ बाळमित्र. गंगा- पण ज्या पुरुषाचा हा हिरा आज गमावला अ- सेल त्याला किती खेद होत असेल! त्याची मला दया येती. विना०- हरणी गमावण्यापेक्षा असा हिरा गमावणे फार वाईट, गंगा- पण यमनी फार चांगली, मजवर किती तिची आवड असे, मी लहानपणापासून बाळगली, आ- णि दिवसें दिवस ती फार मौजेचे खेळ शिकली. य- मनीपेक्षां का आंगठी चांगली १ मोठ्या राजाची आं. गठी असली तरी मला यमनीपेक्षा चांगली वाटणार नाही. विना-ह्या आंगण पुढे तुझी हरणी काय आणली आ- हे. तशा हरण्या तर हजारों मिळतील ह्या आंगठीवर. गगा- अहा हा ! काय माझ्या हरणीची सर करील आंगठी ! त्वां जरी ही मला दिली तरी मी आपली यमनी देणार नाही. ज्याची ही आंगठी गमावली त्याजवळ अशीच दुसरी असेल. मजजवळ काय एकच यमनी, ह्मणून त्याच्यापेक्षां माझें दैव वाईट. विना०- ताई, पण ही कोणा मातबराची असावी, ना. ही बरें ! गरिबाजवळ असली कुठची ९ गंगा- होय, पण खडा निखळला ह्मणून तो बसवाव. याकरितां सोनाराकडे घेऊन जातांना कोणी चाक- राने ही वाटेंत गमावली असावी, किंवा सोनारापा- सून पडली असावी, परंतु ज्याचे हाताने हरवली