पान:बाळमित्र भाग २.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. जी, आणि विठू, ह्यांस ) जा येथून लबाडांनो, तोंड काळे करा: वाईट ही तुमची चाल; थांबा आतां, तुमचे बापांस सांगून त्यांजकडून तुमची खा. डच काढतों.. दा०वि०-(त्याचे पायां पड़न ह्मणतात.) दादासा- हब, आमी चुकलों, येवढ्या कामाच्या अपराधा- ची क्षमा करा, आजपासून आमी तुमचे घरी क- धी येणार नाही. जय०- आतां नाहीं कसें : हा गोष्टींचा बंदोबस्त मला हजार कामें गकून केला पाहिजे; तुमच्या कपट रीतीपासून माझ्या एकट्या मुलास वाचवून उपयोग काय? या गांवांतील सर्व मुलांस वांचविले पाहिजे; खेळण्यावर नफा मिळविणे हा उदीम सान्यांत वाईट आहे. तुझी इतके लहान असतां आतांशीच अशी कमै करितां, तेव्हां पुढे काय काय अनर्थ कराल नकळे. पण तुह्मीही वाईट चाल टाकाल असे मला वाटते, ह्मणून मी तुझांस सोडून देतों, पण तुमच्या आईबापांस मात्र सांगेन. आतां पुरती आठवण ठेवा; जर इतःपर कोणाशी अशी लबाडी केली तर मी तुमची दुर्दशा केल्या. वांचून सोडणार नाही. (दाजी व विठू दोघेजण फजीत होऊन निघून जातात. ) ( मग तात्यास ह्मणतो.) त्वां गोविंदापासून इतकें जिंकून घेतले हे खरेंना ९