पान:बाळमित्र भाग २.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१४ बाळमित्र. तर खरेच सांग, तुझी माझ्या मुलांस ठकवावयाचा मनसोबा केला होता की नाही गोवि०- होय, दादासाहेब, खरेंच ने; माझे मनांत अ. से आले होते की आपण जितके पैसे हारविले तितके पुन: दुसऱ्यापासून मिळवावे, ह्मणून ह्या मुलांशी गट्टी करणे प्राप्त झाले, अशी लबाडी क. रकरून ह्या तात्याने माझे पैसे किती जिंकिले हे जर तुझांस माहीत झाले असते तर तुझी झाला तुरुंगांतच घालावयाला सांगतां. जय०- ठीक झाले, अशा लुच्चांची संगत धरली त्या- चें फळ झाले, ही बरीच तुला शिक्षा घडली. असो, पण त्वां किती काय गमाविले ते सांग. गोवि.- दोन मोहरा, चाकू, कातर वगैरे में काय होते ते सर्व तात्याने घेतले. याशिवाय आणखी एक माझें चित्र अडकावून ठेविलें आहे, न्याबद्दल मजवर एक मोहर लादली आहे, आणि ह्मणाला की माधवास आझांकडे खेळावयाला आण, नाहीं तर तुझे बापाजवळ सांगू. शिव०- हे त्याचे बोलणे खरे असेलसे वाटते, कां की ह्याप्रयाणेच त्याने मला आज सकाळी सांगितले होते, अशी लबाडी करावयास न्याला फार वाईट वाटलें. दादासाहेब, मी तुझांला सांगतों, लबाडीचे मुख्य घर तात्या आणि ते दुसरे दोघे- जय०- तूं बोललास ते माझ्या थ्यानांत आहे. (दा-