पान:बाळमित्र भाग २.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. ३१३ विंदाचा चळकांप होतो.) तूं कांपतोस कां ? तुला धनुर्वात झाला की काय ? गोवि०- (त्याची बोबडी वळते.) होय होय मीमीमी- . जय- असें, रे, काय करतां हें ९ एक तोतर बोल. k तो, एकाला डगडगां घाम आला, एकाला कांप सुटला. तात्या, तूं तर अगदी माशा खाल्ल्यासा- रखाच दिसतोस १ माध०- इतक्यांत ह्यांना असे काय झालें : जय०- ह्याचे कारण मी तुला सांगतों; ह्यांचे मनांत लबाडी करावयाची होती; हे ह्यांचे मुखचर्येवरूनच कळून आले. माध०-का? असे का ह्मणतां तुमी हातर डाव आहे. कोण हरेलनी कोण जिकेल. म्यां आणि माझे बहिणीने जिकिले की नाही ? तात्या-(अंमळ अवसान धरून.) हरलेल्या पैशां. ची फेड गोविंदावांचून अवघ्यांनी केली की नाही गोविं०- मी कोठून देऊ ? तुझींच माझे सर्व पैसे ल. बाडीने जिकून घेतले. जय०- ( मनांत ह्मणतो) बरे ह्या गट्टीतील एकतर फुटला; ही म्यां बरीच कल्पना काढली. ( मोठ्या- ने ) माधवा, पहा हे तुझे सोबती कसे आहेत ते. भाध०-दादा, हे काही इतके लबाड नाहीत असे मला वाटते. जय०- गोविंदा, तूं ह्या सर्वांतून अंमळ खरा दिसतोस.