पान:बाळमित्र भाग २.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ बाळमित्र. झी गलत कशी काय आहे ती. (तात्या इकडे तिकडे चुकावतो, पण जयराम बळेच दस्त घेऊन चाळून पाहतो.) ही हुकुमांची उंच उंच पाने सर्व एकीकडेसच लागलेली आहेत,ही अशी कशीरे ग- लत ९ राधे, आपला चांगला जोड होता तो कां दिला नाही १ तो आण बरें, पाहूं.. राधा- मला काय ह्मणतां ९ ह्यांनीच ह्या गंजिफा आ. पल्याबरोबर आणिल्या, आणि मी आलें नाहीं तों हे खेळावयास देखील बसले होते. जय.- (तात्यास ह्मणतो.) ह्या आमच्या गंजिफा घे, ह्यांत कांहीं घालमेल व्हावयाची नाही. (तात्या तो जोड भीतभीत घेतो. ) तुझी. कोणता खेळ खे. ळतां माध- एकतिशी. जय-पैज काय लावितां १ राधा-दर कवडीस दोन आणे. म्यां इतकें जिंकिलें आहे, ह्याशिवाय गोविंदाकडे माझा एक रुपया येणे आहे; तो खेळ झाल्यावर मोहर मोडून देणार आहे. जय०- बरें, तर, दरकवडीस दोन आण्यांचा करार ठीकच आहे; पण मला पाहूंद्या, अवघ्यांजवळ खे- ळापुरते पैसे आहेत किंवा नाहीत ते. ह्याकरिता सर्वानी आप आपलाले पैसे मला दाखवावे. गोविं- दा, दाखीव तुजजवळ किती पैसे आहेत ते. (गो.