पान:बाळमित्र भाग २.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. बाळमित्र. दाजी- तर आतां दुप्पट पैज लावू. माध०- होय, मी कबूल आहे, माझे जवळ पैसे पु. ष्कळ आहेत, तुमी किती जिंकाल. ( तो आप- ली पिशवी दाखवितो. त्या पिशवीकडे पाहून ता. त्या व त्याचे गडी खुशाल होतात, ) राधा- मजजवळही माधवासारिखे पैसे आहेत. तात्या- बरें तर, पहिल्याने जे डाव झाले त्यांचा अगोदर हिसाब करूं, मग खेळावयास लागू. ( ता. त्या कवड्या मोजितो.) म्यां बत्तीस कवड्या हा. रविल्या, दोन रुपये झाले, हे घ्या आपले. विठ- माझ्या चाळीस कवड्या झाल्या, तर अडीच रुपये झाले ते हे घ्या. दाजी- माझें दैव फार वाईट, म्यां पांच रुपये हार- विले. माध०- तुझे किती गेले, गोविंदा ९ गोवि.- मजकडे एक रुपया मात्र झाला आहे; तो खेळ झाल्यावर मी मोहर मोडून देईन. राधा- आतां पहा मला किती पैसे मिळाले ते ! ( मो. जिते.) सात रुपये झाले. माघ- तर बाकीचे मला मिळाले, कायगे ? आमी दोघांनींच जिकिलें हे मला मोठे आश्चर्य वाटते. विठ्ठ- मी तर कधीच जिकीत नसतों. गोविं०- बरें, पण, आतां तर दोन आण्यांची पैज । आहेना १