पान:बाळमित्र भाग २.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. ३०९ की पण थोडा आहे. गोवि०- बरें, आतां अशा गप्पाच मारीत बसतां की कांहीं खेळतां तात्या- माधव येई पर्यंत खोळंबले पाहिजे. आपण त्याचे घरी आज पाहुणे आलो आहो.. प्रवेश ११ माधव, राधा, गोविंदा नात्या, दाजी आणि विठू. माध०- (पेढेबी जांब वगैरे मेवा मिठाई घेऊन ये- तो) चालूद्या आतां, मी आलो. विठू- आतां अगोदर कवड्या वांदन घ्याव्या, पण दरकवडीस किंमत काय ठरवावी ? माध०- मी पहिल्याने खेळलो होतो तेव्हां दरकवडी- चा एक आणा धरिला होता. राधा- बरे, चला, एक आणा का होईना १ तात्या- तर आतां खेळावयास लागतो. (तात्या गंजिफा वांटन देतो. त्याचे यक्तीने राधा व माधव हे लागोपाठ तीन डाव जिकितात.) राधा- अहा, असेंच जर आह्मी जिंकीत गेलों तर माझे बोलणे खरे होईल. तात्या- अॅ: एका आण्याचीच काय पैज करावी, तीत कांहीं फारसा नफा नाहीं तोय नाही.