पान:बाळमित्र भाग २.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. भरवेल राम०- मुली, तुझे गोड भाषण ऐकून माझें चित्त फार संतुष्ट होते. ये, मला मुकादे. तुजमध्ये इतका समज आहे. आणि असे प्रौढ भाषण धैर्याचे करि- तेस, तेणेकरून मला फार आनंद होतो; आणि तुझें अजात शत्रूच्या सारखे बोलणे ऐकून मला अति आश्चर्य वाटते, आणि हर्ष पोटांत मावत नाही. गंगा- मजकडे काय आहे, आपल्याच हाताने केलेलें कर्म आपल्या कामास येते; पण मजसारखीच हा यमनीवर प्रीति करीत असे. माझें तोडे उतरलेलें पाहून हा फारच कोमावला. राम- जसा तुमचा भाव परस्परांवर नि:कृत्रिम आहे, तसाच ह्या पृथ्वीतील प्राणिमात्रावर आपल्या मुख दुःखांच्या अनुभवावरून समान असावें, झणजे ह्यांत ईश्वर राजी राहातो; परंतु फार लोकांची रीति मी अशी पाहतों की, असा एखादा अन्याय कोणी सेवकांदिकांनी केला असता त्याचे सहन नकरि- तां तत्क्षणी त्या बिचाऱ्यांचे पोटावर पाय द्यावा. गंगा-ईश्वर मला अशी दुष्टबुद्धि नदेवो! काय मनु- प्यापेक्षां पशूवर प्रीति ठेवावी १ किती झाले तरी मनुष्य तो मनुष्य, पशु तो पशु. राम.- प्रस्तुत इतकी समसमान प्रीति कोणाची दि. सत नाही. काय, स्वकीय सरणांत उडी घालतील