पान:बाळमित्र भाग २.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. प्रवेश ६, गंगा आणि विनायक. विना०- गोपाळा तर फारच क्रोधिष्ट आणि उतावळा. थोड्यासाठी उगीच मोठा कज्जा काढतो. त्याचे म- नांत मारामारी करावी असे होते, पण येथे कला- गत नहोतां एकदाचे दोघे बाहेर गेले, एवढ्याने फार चांगलें झालें. गंगा- कज्जा झाला असता तर मग रावजी आपणां- ला फारच रागे भरले असते. गोपाळाचें अंतःक- रण आपणांविषयी भारी कळवळते, अशी माझी खातर निशा झाली; परंतु हरणी सांपडावी ह्या पेक्षा आपला सूड उगवावा हे त्याचे मनांत फार आहे, नाहीं बरें। विना०- त्याची खोडच आहे, उगीच मधे मधे तोंड घालून ढवळा ढवळ करावी, अशानेच कामाची घाण झाली. लक्षुमणाने चोरली आहे तर गोडी गुलाबीने येईल तशी कज्जा केल्याने येणार नाही. पण ते रावजी आले, पहा. प्रवेश ५ रामराव, विनायक, आणि गंगा. राम- कायरे मुलांनो, तुझी लक्षुमणाचे काय केले ?