पान:बाळमित्र भाग २.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ बाळमित्र.. गंगा- अहो, आमची गोजिरवाणी हरणी हरपला हो! ल- हं! हं! अरेरे फार वाईट झालें ! चांगली हो- ती; तिचे रूप काय; तिचे आंग किती मऊ असे; पोटाखाली कसा पांढरा रंग होता; पाय आणि शे- पूट काय चमत्कारिक दिसतअसत! दोन कवड्यां- ची जरी होती तरी ती तुमची दोन मोहरांची, गंगा- तुझी इतकी माहितगारी सांगतां त्यापक्षी ती कशी हरपली हें निश्चये तुमचे पाहाण्यांत आले आहे, व शोध लागावयाचा तोही तुह्मांकडूनच लागेल. ल.- काय, मी तुमचा चाकर आहे, की मजकडे ति. ची रखवाली सांगितली आहे १ विना- तूं ताईचे बोलण्याचा अभिप्राय मनांत न आणतां उगीच रागास येऊ नको. गंगा- ह्यांत तुला राग तो कशाकरितां आला १ एक तर तूं आमचा शेजारी, आणि हरणी कोठे लांब हरपली असें कांहीं नाहीं; त्यांत तूं शोध करण्या• विषयी आमच्यापेक्षां शहाणा आहेस, ह्मणून ह्मणते. गोपा०-ठीकच आहे, ह्याला सोडून दुसऱ्या भल्या म. नुष्यास विचारण्याची गरज नाही. ल.- ह्यांतला अर्थ कायरे ९ गोपा.- ह्यांतला अर्थ ज्याचे आंगी दोष असेल त्या- ला माहीत, तथापि मी सर्व कृत्य जाणून आहे. ल- ह्यासमयीं गंगा येथे नसती तर,