पान:बाळमित्र भाग २.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. १५ विना०- असे करूंनये; अशाने लागलाच कजा मात्र होईल, आणि रावजी आपणांवर मनस्वी रागें भर- तील; ह्या साठी मला वाटते की, कजा व छद्मी भाषण करावे ह्यापेक्षां गोडशब्द बोलल्याने आपले काम सिद्धीस जाईल तर बरें. गंगा- ती हरणी माझी आहे असे न्यास माहीत नसेल. गोपा.- असे कसे होईल ! शंभरदां तुमचे भावाब- रोबर तिला चालतांना त्याने पाहिले आहे, आणि फारदां तिशीं तो खेळला आहे, आतां तर त्याने खचीत विकावयासाठींच चोरली. गंगा- अरे, हा लक्षुमण आला पहा ! प्रवेश गंगा, विनायक, गोपाळ, आणि लक्ष्मण. ल.- गोपाळराव, माझे चाकराने तुमचा निरोप मला सांगितला, की तुझी मला खेळावयास बोलाविले. चला तर मी सिद्ध आहे. कां विनायकराव. खुशा- ल आहां की ? गंगाबाईची भेट झाली हेही बरेच झाले. गंगा- बाबा, खेळण्यावर तुमचे लक्ष, पण इकडे आ- मचे तोंडचे पाणी पळाले आहे. ल-कां १ का