पान:बाळमित्र भाग २.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. गोपा.- तिजपाशी कशाची; ती फार भली आहे, म- जवर अतिशय लोभ करिती; कां विनायकराव, हे तुह्मांला ठाऊक नाही ९ यमनी ही मजप्रमाणे लाडी गोडी लावावयाकरितां तिचे दुकानाचे ओट्यावर पाय देऊन उभी राहून फळ फळावळ वगैरे हुंगू लागली. विना०- अरेरे, यमनीचा लाड अगदीच कामास आ- ला नाही. मातारीच्या एका धपाट्याने सगळा व्यर्थ गेला. गंगा- थांबरे, ह्यावांचून काय पडलें आहे ९ मग, गो. पाळा ? गोपा०- मी आतां नुकता तिचे दुकानी केळी घ्याव- यास गेलो होतो, तिला मी आपले हरणीचे वर्त- मान कळविले. तेव्हां ती ह्मणाली, काय ती ओं. गळवाणी हरणी गेली १ गंगा- तुह्मी असे माझे हरणीस उगीच वाईट साईट बोलत जाऊ नका. गोपा.- मी कांही पदरचे बोललों असें नाहीं; तिच्या तोंडांतून जी अक्षरें निघाली ती सांगतो. मला म- णते, ओंगळवाणी हरणी तो तुझा देखणा सोबती त्याचीचना ९ मी झटले होय, मग ती ह्मणाली की. सफेतीचे वाड्यांतील जो पोर आहे त्याने ती फु. सलावून नेली.