पान:बाळमित्र भाग २.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

90 बाळमित्र. गंगा- तूं मला तिजविषयींचे दुःख आधिक वाढवितोस; तुझी तिची चुकामूक झाली ती जागा देखील तुला ठाऊक नाही, असती तर तिकडेसच लोकांत शोध लावावयास अवघड पडतेना. विना- मी पैज मारतों; ती खचीत घराजवळ आली, पण ती हुंगीत हुंगीत घरोघरचे अंगणांत जाई, ह्या- मुळे कोणी तरी दरवाजा लावून तिला कोंडलें अ- सावे. गंगा-हे खरेच असेल; असे नसते तर ती आपले ठि- काणी फिरून आली असती; तिला घराची वाट प. केपणी माहीत आहे. . विना०- गोपाळा मजबरोबर होता, यमनी आमचे मा- गें चालत होती. तिला पाहून एक क्षण देखील झाला नाहीं तों इतक्यांत दिसेनाशी झाली. यमनी गमावल्याचे मूळ गोपाळाच. काय सांगू? तो वाटेने चालतांना काय काय तन्हा तन्हा करीत असे; त्या- ने मला यमनीची शुद्ध देखील राहिली नाही. गंगा- तर तुजबरोबर त्याने शोध करायाला यावे की नाहीं । विना.- तो मजबरोबर काल संध्याकाळी आणि आज सकाळी शोध करायाला आला होता. आ- ही सर्व चौकीवाल्यांच्या जागा व बाजार व ग. ल्या वगैरे सर्व जागी शोध केला, पण कोठेही लि. काणा लागला नाही. खरेच सांगतों, माझे आच-