पान:बाळमित्र भाग २.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. मला राहत नव्हते. मी पाठीस लागलों अस मार तिने इकडे तिकडे पळावें, आणखी त्वरेने लोटत ला. टत येऊन माझे भोंवताली मोठ्या हर्षाने उड्या माराव्या, तेव्हां आझांला किती आनंद व्हावा! गंगा- असे होते तर अधिक जतन करावी की नाहा। विना०- करावी; पण ती मजजवळून लांब पळून जाई, आणि पुनः बोलावल्यावांचून येई, ह्यामुळे मला वाटले- गंगा- वाटले ! तुझे वाटण्यास काय करावें । तूं बाप- डा कधी कोणाविषयी अविश्वासी असा नाहीस; पण ह्या मुळे माझी सखी यमनी गमावलीना विना०- ताई, आतां मी तुला वचन देतों की, आज- पासून कदा काळी- गंगा- पुरे पुरे आतां ! मजजवळ काही असले तर गमावशील मात्र तेवढा. काल रात्री मला तिचे खे. दामुळे झोंप देखील डोळाभर आली नाही, अंमळ डोळा लागला तो यमनीचे तोंड उतरून गेले आहे आणि ओरडत मजजवळ आली; हे मी पाहतांच जागी झाले, तो मी एकटीच आहे. अहाहा, ती ही मजप्रमाणेच झुरत असेल ! विना०- ताई, तुला इतके दुःखांत पाहून माझा जीव तिळ तिळ तुटतो. काय करूं आतां ! मी आपली सर्व खेळणी सुखाने सोडीन, पण ती कशी तरी ए. कदा माझे दृष्टीस पडो,