पान:बाळमित्र भाग २.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. लिला की, बक्षिसांचे शिपायांस खर्च होऊन बाकी जे राहतील ते घटकाभन्यां जुगाराची इच्छा झाली झणजे कामास पडतील. त्याचे उत्तर मी त्यास लाजून केले की, अतःपर जुगार खेळणार नाही. मग त्याने मला पोटाशी धरिलें. त्या दिवसापासून मी आपले वचनांत किमपि अंतर न पडूं देतां योग्य आचरण करीत आलों; आणि त्यासमयीं म्यां असा निश्चय केला की, आपले ख्याली खुशालीकडे कांहीं खर्च करूं नये; मग मोठी का. ळजी लावून कर्ज फेडण्याकरितां मी रुपये मागें या- कीत गेलो. आणखी जो काय मला अवकाश होता तो म्यां चांगल्या गोष्टीच्या अभ्यासावर योजिला; आ. णि चाकरी फार जपून करूं लागलों, ह्मणून माझ्याव- रचे जे सरदार होते ते संतुष्ट झाले. सारांश, मी इतके योग्यतेस चढलों याचे कारण हेच की, वाईट चाल सोडून चांगली चाल धरली. ही हकीकत त्या सरदारांनी ऐकतांच ते मनांत खोंचले, आणि ती गोष्ट त्यांचे मनांत ठसली. त्यायो- गें त्यांत जे जुगार वगैरे काय दुर्व्यसन होतें तें अग- दी मोडून तेही चांगल्या रीतीने वागू लागले. त्यांस वाईट आचरणानें पैसा मिळवावयाचा जो छंद होता तो नाहीसा झाला. असा त्या चतुर पुरुषाचे शिकवणीचा परिणाम फार चांगला झाला.