पान:बाळमित्र भाग २.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतापशिंग. त अपकीर्ति मिळविली, व त्यांसही हलकेपणा आ- णिला. आणखी माझे मनांत आले की, राजाचे पलट. णीतून आतां माझी पुरती शोभा होऊन चाकरी निघे. ल. अशी अनेक प्रकारची संकटें एकदाच मनांत उभी राहिली, तेव्हा माझे डोळ्यांवरचा धूर गेला, आणि प. श्यात्ताप पावलों की, जर मी चांगले आचरण केलें असतें तर मला पुढे अधिक वाढावयाची आशा असती, पण तें आतां कोठचे? असा जेव्हां शुद्धीवर आलों तेव्हां हा अपराध दूर करण्याकरितां दुसरा अपराध करावा अ. सा मनसुबा केला, आणि तो सिद्धीस न्यावा. इतक्यांत ज्याने असे पत्र लिहिलें तोच सरदार माझे येथे आला. त्यास पाहातांच मला असा क्रोध चढला की, मी शस्त्र घेऊन एकाएकी त्याचे अंगावर धांवलों, ते वेळेस पु. ढे काय होईल व हा कां आला हे माझे लक्षांत आ- लेच नाही. शेवटी त्यानेच हातचे शस्त्र घेऊन स्नेह वादामुळे मला आलिंगिलें, आणि ह्मणूं लागला की, तुमचे पत्राचे उत्तर म्यां धिक्कार पूर्वक लिहिले ह्मणून तुह्मांस राग आला असेल, परंतु त्या लिहिण्यांत माझा अभिप्राय असा होता की, ह्यावरून तुझांस माहित व्हा- वेंकी वाईट खोडीमुळे तुह्मी कसकसे संकटांत पडलां,आ- णि मलाही समजावें की,माझें पत्र लिहिण्याचे सार्थक्य कसे होते. आतां तुह्मांस ज्यापक्षी पश्यात्ताप झाला आहे त्यापक्षी तुमचें माझें कांही वाटले नाही, घ्या हे रुपये; असें ह्मणून त्याने पिशवी काढली, आणि बो-