पान:बाळमित्र भाग २.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बाळमित्र.

त्या दिवसाचे आदले रात्रीस म्यां आपलें जे काय होते ने सर्व जुगारांत गमावलें; बरें, तेवढ्यावरच गेलें असें नाही, जे सरकाराने कामाकरितां मजकडे रुपये दिले होते तेही गमावले. पाहा तुह्मी, मग त्या मूर्खपणाला व दुःखाला कांही जोडा आहे. त्यावेळी मला भान न राहातां काय करूं कसे करूं अशी अवस्था प्रान झाली. असा जेव्हां मजवर वक्त गुदरला, तेव्हां जेथे माझी पलटण होती तेथें एक स्नेही सरदार होता न्याजकडे म्यां जुगार खेळण्याची हकीकत लिहून रुपये उसणे मागावयाकरितां एक हलकारा ताबडतोब पाठविला. त्याचे उत्तर त्या सरदाराने कसे लिहिलें तें ऐका. त्याने पत्रांत असा मजकूर लिहिला होता की, मी नित्य जुगार खेळणाऱ्यास रुपये देऊन बुडवून टाकू १ आतां रुपये न दिले तर स्नेह तुटेल, तर ज्या स्नेहाने पाणी उतरतें तो स्नेह रुपये पाण्यांत यकून राखावा, तर असा स्नेह राखण्यापेक्षां रुपये राखावे हैं फार चांगले आहे; ह्मणून मी आपले रुपयेच राखितों; मला स्नेहाची गरज नाही. असें धिक्काराचे उत्तर वाचल्यावर मग कशाला विचारतां, ते वेळी मजवर आभाळ कोसळले; त्याचे स्मरण जर आतां झालें तर असे वाटते की, ते कर्म म्यां कालच केले. त्यासमयी असे मनांत आले की, माझे आईबापांस मजविषयी किती राग व किती दुःख झाले असेल: या प्रमाणे म्यां आपले कुळांत व सोयरे धायरे इष्टमित्र ह्या सर्वां-