पान:बाळमित्र भाग २.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रतापशिंग.

चे शिकवणीमुळे त्या स्मरणाने मनांत फार दुःख होई. । ईश्वराचे स्मरण तर कधी झालेच नाही.
 पहिल्याने जुगारांत मला रती अनुकूळ होती, ह्यामुळे तर माझी बुद्धि फारच अष्ट झाली. जुगार खेळण्यामध्ये फारच जे द्रव्य मिळविले होते ते द्रव्य भुईवर आंथरून त्याचा बिछाना करीत असे, ह्यासाठी की, माझ्या ओळखीच्यांनी ह्मणावे, हा आजकाल द्रव्यांत लोळतो आहे.
 अशा नीच कमीत मी आपल्या वयाची तीन वर्षे फुकट घालविली, त्या तीन वर्षांचे स्मरण मनांत लज्जा आणल्या वांचून होत नाहीं; कारण, त्या वर्षांनी माझे प्रतिष्ठेस फारच बहा लावला; तो तुह्मांस काय सांगू त्या तीन वर्षांचा कलंक जावा ह्मणून किती जरी यत्न केला तरी काही जावयाचा नाही. ह्या खेरीज देहाने न होण्यासारखी आणखी एक गोष्ट मजकडून झाली,ती सुधारावी ह्मणून आज वीस वर्षे यत्न करितों आहे, तरी सुधरत नाही; ती सांगावयास मला मेल्याचा पाड चढतो, आणि त्या गोष्टीचे स्मरण झाले झणजे मी किती जिवाला खातों; पण तितकेही सोसून ती गोष्ट तुमचे हितासाठी तुझांला सांगतो.
 एके समयीं मला भरतीचे शिपाई मिळवावे ह्मणून आज्ञा झाली; तेव्हां ह्या द्वाड व्यसनांत मी राहिलों आणि ते काम हवलदारास सांगितले. मग चार दिवसांनंतर हवलदार वीस माणसें बक्षिसासाठी घेऊन आला,