पान:बाळमित्र भाग २.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बाळमित्र.

रण, दुसरें, त्यांनी ह्याविषयी अति आग्रह केला, ह्यमुळे माझें मन वेढून गेले.
 मग मी त्यांशी नित्य नित्य जुगार खेळू लागल्यामुळे मला असा छंद लागला की, त्याखेळावांचून दुसरे काही सुचेना; अगदी मोहून गेलों; मला एखादे वेळेस तो खेळ सोडून काम करण्याचे पडल्यास त्या कामाचा अतिशयित तिटकारा वाटे.
 विश्रांति जर ह्मणाल तर एक घटकाभर झोप मात्र घेई, पण ती तरी जुगार सोडून घेणे मटलें मणजे फार प्राणसंकट पडे. बरें, तितक्यांत तरी गाढमूढ नीज किंवा जुगाराशिवाय दुसरें स्वम १ हेही नाही. स्वमांत रुपयांचे ढीग पाहावे, व फांशांचा उच्चार करून मोठ्याने बरळावे, असें निरंतर निद्रा होई तोपर्यंत होत असे.
 पहा, भोजन हे सर्वांस स्वभावेंकरून प्रियना । पण मला तितकाच वेळ व्यर्थ गेला ह्मणून तें उत्तम अन्न विषवत वाटावें. माझे जुगार खेळावयाचे सोबती ह्यांचा व माझा फार वियोग नव्हावा ह्मणून मजकडून जितकी त्वरा होई तितकी मी करीत असे.
 वसंतकालादिक जे काय ईश्वराने मनुष्यांस मुखव्हावे ह्मणून केले आहे, व सणांचे दिवस, त्या सर्वाचा मी अनादर केला, ह्यामुळे ते सर्व सुख मला अंतरलें. जुगार खेळणारे सोबती यांवांचून कोणाशी भाषण देखील नाही, मग स्नेह तर फारच लांब, आईबापांचे स्मरण जर कधी मला झाले तर त्यां'