पान:बालहक्क (Balhakk).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न ७ ग्राम बाल संरक्षण कृती दलाचे कार्य सांगा ?
उत्तर:  १. बालकासंदर्भातील कुठल्याही घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तात्काळ कमीत कमी वेळेत, घटनेच्या ठिकाणी पोहचून तातडीने मदत उपलब्ध करणे.
   २. सदरच्या गरजू, प्रभावित बालकास अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय चिकित्सा, संरक्षण याची व्यवस्था करणे.शासकीय, अशासकीय यंत्रणेच्या / नागरिकांच्या मदतीने गरजेच्या सेवा पुरविणे आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणे.
   ३. जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महाराष्ट्र बाल संरक्षण संस्था निर्मित यंत्रणेस त्वरित केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल तातडीने पाठवणे. तसेच कार्यवाहीचा अहवाल शक्य तितक्या लवकर बाल संरक्षण समितीला विहित नमुन्यात सादर करणे.
प्रश्न ८   बाल संरक्षण समितीच्या बैठका आणि अहवाल सादरीकरणाचे नियम सांगा.
उत्तर:  १. बाल संरक्षण समितीची महिन्यातून किमान एक वेळा बैठक आयोजित करणे. (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा ही बैठका होवू शकतील.)
   २. सदर बैठका शाळेच्या जागेत किंवा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात याव्यात.
   ३. सदर समिती गठीत झाल्यापासून ५ वर्षांसाठी कार्यरत राहिल.
   ४. एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्यास त्या व्यक्तीच्या जागी दुसया व्यक्तीची नेमणूक ही इतर सदस्यांबरोबर चर्चा करून करण्यात येईल.
   ५. ग्रामस्तरावरील बाल संरक्षण समितीने तालुका स्तरावरील समितीस अहवाल सादर करावा. समितीने जिल्हा बाल संरक्षण एकक (DCPU) यांना अहवाल सादर करावा. ते सदर अहवाल जिल्हाधिका-यांना सादर करतील. ग्राम/तालुका/नगर बाल संरक्षण समितीने अशा प्रकारे जिल्हा स्तरावर समन्वय साधणे आवश्यक राहिल.