पान:बालहक्क (Balhakk).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२) काळजी व सदर प्रकरणे हाताळणारी सक्षम प्राधिकरणे तसेच तक्रार निवारण समिती उदा. बाल कल्याण समिती / बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष इ. शी समन्वय साधणे.
 बालक, तरुण तसेच प्रौढ इ. च्या सहभागासाठी प्रोत्साहन
 * बालकांच्या जीवनाशी निगडीत असणा-या सर्व बाबींवर निर्णय घेताना बालकांचा सहभाग आवर्जून घ्यावा.
 * त्यांच्या मताचा आदर करावा.
 * त्यांच्या रहाणीमानावर परिणाम करणा-या बाबींवर निर्णय घेण्यासाठी त्यांना पाठिंबा द्यावा, प्रोत्साहित करावे
 * तसेच त्यांच्या निर्णयाचा आदर करावा.उदा. ग्राम सभा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा इत्यादी
 ब) 'उपाय योजनात्मक कार्य :'
 बालकांसंबंधातील विविध प्रकरणे ओळखून त्यामध्ये मध्यस्थी तसेच सहाय्य करून या प्रकरणांचे निवारण करणे,
१) बाल संरक्षण संदर्भातील विविध समस्या उदा. शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार, हिंसात्मक कृत्ये तसेच बालकांचे शोषण निवारण संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणे.
२) बालकांवर परिणाम करणा-या विविध संदर्भात उदा. बालविवाह, बाल कामगार, अनैतिक व्यापार, बालकांचे लैंगिक शोषण याबाबत प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक उपाय योजना करणे.
३) बालकांसंदर्भातील अत्याचाराच्या तसेच शोषणाच्या घटनावर योग्य ती कायदेशीर भूमिका संबंधितांना कारवाई करण्यास / भूमिका घेवून भाग पाडणे.
४) पीडित बालकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करणे.
५) गाव स्तरावर बालसंरक्षण कृतीदलाची स्थापना करणे.
६) पोलीस पाटील, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी, दोन सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचा सदस्य हे या कृतीदलाचे सदस्य असतील.
 सदरच्या ग्राम बालसंरक्षण कृती दलाच्या सदस्यांची निवड समितीच्या पहिल्या सभेतच करावी.