पान:बालहक्क (Balhakk).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न ६.   ग्राम बाल संरक्षण समितीची कार्ये सांगा.
उत्तर :अ) प्रतिबंधनात्मक कार्य :
  समस्या शोध
१) अ) गावातील / वॉर्डातील काळजी व संरक्षणाची गरज असणा-या बालकांची माहिती गोळा करणे.
 ब)  बालकांची काळजी व संरक्षण करण्याची गरज निर्माण करणा-या कारणांचा, घटकांचा, समस्यांचा शोध घेणे.
 क)  जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या नियोजन नमुना आरखड्यामध्ये बाल संरक्षण बाबींवर वार्षिक नियोजन करणे.
२) बाल संरक्षण, बाल हक्क व बालकांचा सहभाग याबाबत ग्रामस्तरावर
 अ)जाणीव जागृती करणे
 ब)या विषयांना गावाच्या वॉर्डाच्या अर्थसंकल्पामध्ये, नियोजनामध्ये, प्रशासनिक कामामध्ये प्राथमिकता मिळवून देणे.
 क)त्यासाठी आर्थिक तरतुद करणेस भाग पाडणे.
३) बालकांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल अशा विविध शासकीय योजनांचा, स्त्रोतांचा शोध घेणे, सदर योजनांचा लाभ बालकांना / कुटुंबाला मिळवून देणे.
 योजनांचे एकत्रीकरण व समन्वय :
१) काळजी व संरक्षणाची गरज असणा-या तसेच विधी संघर्षग्रस्त(गुन्हेगारीत अडकलेल्या आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरु असलेल्या)बालकांना आणि त्यांच्या कुटुंबाला अन्न,वस्त्र,निवारा,सामाजिक सुरक्षा,वैदयकिय सुविधा,निर्वाहाच्या सोयी तसेच शिक्षण या बाबत शासकीय योजनांचा एकत्रित लाभ देणे आणि त्यामध्ये समन्वय साधणे.