पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खानदेश जिल्ह्यांत मवास संस्थानांतल्या लोकांपासून प्राप्तीवरचा कर घेऊं नये, असा ठराव सरकारानें केला आहे. त्याप्रमाणें युनिव्हर्सिंड्यांच्या उत्पन्नावर आणि विद्यावृद्धीकरितां जमविलेल्या पैशावर कर घ्यावयाचा नाहीं. विलायतेस राष्ट्रीय सभेची मंडळी उद्योगार्थ गेली आहे; तीस इकडून पैशाची मदत होत नसल्यामुळे तिचें काम बंद पडण्याचें लक्षण दिसंत आहे. फार वाईट ! बिनधुराची दारू करण्यास कापुराचा पुष्कळ उपयोग करावा लागतो. आणि फ्रान्स देशाचें सरकार आपल्या सैन्याकरितां तशी दारू तयार क रीत आहे; ह्मणून कापुराचा खप फार होऊन त्याचा भाव फार वाढला आहे. फिलाडेल्फिया येथें एक घड्याळ तयार होत आहे, त्याच्या आंतल्या घांटेचें वजन पंचवीस हजार पौंड आहे; तबकडीचा व्यास २५ फूट आहे; मिनिटकांटा १२ फूट आहे; अवरकांटा ९ फूट आहे; त्याच्या आंत वि- जेचे दिवे लावायाचे आहेत; आणि त्याला किल्ली द्यायाला एक वाफेचें यंत्र ठेवायाचें आहे ! सगळेंच राक्षसी काम ! नद्यांवरचे फिरते पूल, आणि रेल ओलांडून जाण्याचे दरवाजे, आग- गाडी जातेवेळेस, जागच्या जागीं नसले झणजे अपघात होतो. असे अप- घात टाळण्याकरितां, एका नवीन युक्तीप्रमाणें, या पुलाच्या अगर दरवा- ज्याच्या दोहों बाजूंस, बऱ्याच अंतरावर, रेलांच्या जवळच एक सुमारें तीन हात लांब व मध्यें उंच व शेवटांकडे सखल होत गेलेली एक फळी बसवून तिचा संबंध त्या पुलाशीं अगर दरवाज्यांशीं जोडितात. पूल व दरवाजे जागच्या जागीं असले, ह्मणजे, ती फळी रेलांच्या सपाटीच्या खालीं असते, आणि गाडी निघून जाते. परंतु ते जागीं नसले झणजे ती फळी वर होते आणि ह्या युक्तीच्या संबंधानें एंजिनांच्या पुढच्या चाकांच्या तुंब्यास एक खालीं आलेला दांडा असतो, त्याला त्या फळीचा दाव लागून एकदम जो- रानें ब्रेक फिरताद आणि गाडी थोडीशी पुढे जाऊन उभी राहाते, आणि अपघात टळतो.