पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ लोक काय बोलतात. उद्योगोत्पन्नपदार्थसंग्रहालय मुंबईमध्यें स्थापण्याचा विचार चालला आहे. गेल्या महिन्याच्या साहाव्या तारखेपासून पावसाळा चालू झाला. पाऊस बरा पडत आहे. रावत्र. मणिभाई हे श्री. गायकवाड सरकारचे दिवाण झाले; हे अनुभ- विक कामगार आहेत. सार्वजनिक सभांस सरकारी कामदारांनीं जातां देखील कामा नये, असा ठराव सरकारानें केला आहे. बरा नाहीं. झांशीच्या आसपास दरोडेखोर आहेत, ते असें भय घालतात कीं, आह्मी डांक लुटूं. सगळ्या हिंदुस्थानाचे प्रसिद्ध कमांडर इन् चीफ सर फ्रेडरिक राबर्टस ह्यांस आणखी दोन वर्षे तें काम चालविण्याची परवानगी मिळाली. काबूलच्या अमीरांचे चिरंजीव, नवीन त-हेची बिनधुराची दारू कर- ण्याचा कारखाना घालण्याच्या विचारांत आहेत. मुंबईत शेकअल्लीउमार गल्लीमध्यें एक चौमजली घर बांधतां बांधतां पडलें, आणि त्याखालीं सात माणसें मेलीं ! वाहावारे मुंबईतल्या घरांची मजबुती !! अमेरिकेंतल्या स्वतंत्र संस्थानांच्या खजिन्यांत अड्डावीस कोटि रुपये शिक आहेत, त्यांचें काय करावें हें त्यांस मोठें कोडें पडलें आहे. इतर देशांस उत्पन्न खर्चास पुरत नाहीं. कर्जे वाढत चालली आहेत ! ड्यूक आफ् कनाट ह्यांस इंग्लंडच्या मुख्य सेनापतीची जागा मिळावी अशी आपल्या महाराणी साहेबांची इच्छा आहे ह्मणतात. पण तें लोकांस आवडत नाहीं. हिंदुस्थान सरकारच्या लष्करी खात्याचा हिशेत्र ठेवण्याच्या खात्याची सुधारणा झाली. तींत मोठमोठ्या पगाराचे कितीएक नवे अधिकारी नेमिले. खर्च कमी करावयाचा ना ?