पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ होऊं नये; अशानें यश येणार नाहीं; नादिरशाहा आला तरी त्यानें हैं छत नेलें नाहीं. टंचाई असल्यास मी पांच लक्ष रुपये देतों. हा सल्ला भाऊंनीं ऐकिला नाहीं आणि छत काढिलें; तों तें केवळ तीन लाखांचेंच भरलें!! आणि विनाकारण सुरजमल्लाचा अपमान झाला. तरी झालेली गोष्ट पुढे सांवरायाची टाकून, दुराणीजवळ आले, पुढे काय करावयाचें याबद्दल त्यानें चांगला सल्ला दिला असतां भा ऊसाहेबांनी जाबसाल केला कीं, 'आह्मी कांहीं दक्षिण सोडून तुमचे बळावर आलों नाहीं; आमचे चित्तास ये- ईल तसे करूं. तुझीं राहावेल तर राहावें, नाहीं तर आ- पले ठिकाणास जावें. गिलच्यांचें पारिपत्य केल्यावर तुझी आह्मी समजून घेऊं' ! ! पुढे भाऊसाहेब सुरजमल्लास कैद करणार आहेत असे शिंदे व होळकर यांस समजल्याव- रून त्यांनी त्याला इशारा दिला आणि तो रात्रीच्यारात्रीं निघून गेला. ह्याप्रमाणें, भाऊंच्या अभिमानामुळे आणि एककल्लीपणामुळे जाटांचें साहाय्य गेलें; आणि शिंदे व होळकर यांशीं बेबनाव झाला. होळकर ह्यांनीं भाऊंस सांगितलें कीं, हातघाईस येऊन लढण्याचें करूं नये, मराठ्यांची लढण्याची जी नेहमींची रीत तीप्रमाणें लढावें; ह्मणजे जय होईल. तें न ऐकतां, 'कुणबटाचें काय ऐकतां ?" असे ह्मणून त्यांचा धिक्कार केला ! ! अशी ज्या सैन्याची स्थिति, तिला जय कसा मिळावा ? भाऊंच्या सगळ्या कृत्यांचें मंडण करून, मराठ्यांच्या शौर्यास काळिमा लावण्यापेक्षां, भाऊंच्या चुक्या प्रांजल- कबूल कराव्या हें बरें दिसतें. पणें